ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

तुमचे स्थान उपग्रहाद्वारे iPhone वर ‘शोधाशोध’ मध्ये पाठवणे

iPhone 14 किंवा नंतरच्या iOS 16.1 किंवा नंतरच्या व्हर्जनसह, जेव्हा तुम्ही मोबाइल सेवा आणि Wi-Fi कव्हरेजच्या बाहेर असाल, तेव्हा उपग्रहाद्वारे तुमचे स्थान शेअर करण्यासाठी तुम्ही शोधाशोध ॲप वापरू शकता.

नोट : उपग्रहाद्वारे तुमचे स्थान शेअर करणे सर्व देश किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. उपग्रह उपलब्धताद्वारे आपत्कालीन SOS ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.

मोबाइल सेवा आणि Wi-Fi कव्हरेजपासून तुम्ही डिस्कनेक्ट करण्यापूर्वी

जर तुम्ही मोबाइल किंवा Wi-Fi नेटवर्कला कनेक्ट केलेले असाल तरच ‘शोधाशोध’ ची अधिक फीचर उपलब्ध असतील. उपग्रहाच्या माध्यमातून फ्रेंडबरोबर तुमचे स्थान शेअर करण्यासाठी, तुम्ही मोबाइल सेवा किंवा Wi-Fi कव्हरेजच्या बाहेर जाण्या पूर्वी पुढील गोष्टी करा :

  • तुम्ही तुमच्याबरोबर आणलेल्या iPhone ला iPhone म्हणून सेट करा जो तुमचे स्थान शेअर करतो. तुमच्या iPhone 14 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर शोधाशोध ॲप उघडा, स्क्रीनच्या तळाशी असलेल्या ’मी’ वर टॅप करा, त्यानंतर ’माझे स्थान शेअर करा’ चालू असल्याची खात्री करा. जर तुमचा iPhone सध्या तुमचे स्थान शेअर करत नसेल, तर ’हा iPhone माझे स्थान म्हणून वापरा’ वर टॅप करा.

  • तुम्हाला तुमचे स्थान ज्यांच्याबरोबर शेअर करायचे आहे ते संपर्क समाविष्ट करा. ’शोधाशोध’ मध्ये तुमचे स्थान शेअर करा. पहा.

उपग्रहाच्या माध्यमातून तुमचे स्थान पाठवणे

जर तुम्ही मोबाइल नेटवर्क किंवा Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेले नसेल, तर उपग्रहाच्या माध्यमातून तुमचे स्थान शेअर करण्यासाठी तुम्ही शोधाशोध ॲपचा वापर करू शकता. उपग्रहाच्या माध्यमातून फ्रेंडबरोबर तुमचे स्थान शेअर करण्यासाठी, तुम्ही तुमचे स्थान त्या फ्रेंडबरोबर ’शोधाशोध’ मध्ये आधीच शेअर केलेले असावे. ’शोधाशोध’ मध्ये तुमचे स्थान शेअर करा. पहा.

  1. तुमच्या iPhone वरील शोधाशोध ॲप वर जा.

  2. तुम्ही बाहेर असताना आकाश आणि क्षितिज स्पष्ट दिसत असल्याची खात्री करा. जर तुम्ही दाट पर्णसंभार आहे अशा ठिकाणी असाल किंवा इतर अडथळ्यांच्या मध्यभागी असाल, तर तुम्ही कदाचित उपग्रहाशी कनेक्ट करू शकणार नाही.

  3. स्क्रीनच्या तळाशी ‘मी’ वर टॅप करा.

  4. ’माझे स्थान पाठवा’ वर टॅप करा (’माझे स्थान’ च्या खाली उपग्रहाच्या माध्यमातून), नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    जर तुम्हाला सॅटेलाइटला कनेक्ट करण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे वळावे लागत असेल, तर तुमचा iPhone मार्गदर्शन प्रदान करतो—फक्त ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.

    नोट : उपग्रहाच्या माध्यमातून तुमचे स्थान पाठवायला काही मिनिटे लागू शकतात; संदेश पाठवला जाईपर्यंत ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करणे चालू ठेवा.

तुम्ही तुमचे स्थान दर 15 मिनिटांनी पाठवू शकता. जेव्हा तुम्ही उपग्रहाद्वारे तुमचे स्थान पाठवता, तेव्हा तुम्हाला शोधाशोध ॲपमध्ये तुमच्या फ्रेंडचे स्थान दिसत नाही.

उपग्रहाच्या माध्यमातून पाठवलेले फ्रेंडचे स्थान पाहणे

उपग्रहाद्वारे पाठवलेले फ्रेंडचे स्थान पाहण्यासाठी, तुमच्या iPhone वर iOS 16.1 किंवा नंतरचे व्हर्जन इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे (तुम्हाला iPhone 14 किंवा नंतरच्या व्हर्जनची आवश्यकता नाही).

जेव्हा एखादा संपर्क तुम्हाला उपग्रहाद्वारे त्यांचे स्थान पाठवतो, तेव्हा त्यांच्या पिक्चरच्या पुढे उपग्रह आयकॉन दिसतो आणि उपग्रहाचे स्थान शोधाशोध ॲपमधील टेक्स्टमध्ये दिसते. त्यांचे सर्वात अलीकडील स्थान 7 दिवसांपर्यंत बघितले जाऊ शकते.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.