ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर Apple Intelligence आणि गोपनीयता

Apple Intelligence*, AI मध्ये गोपनीयतेसाठी एक अभूतपूर्व पाऊल पुढे टाकत, तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करत असताना, तुमच्यासाठी प्रासंगिक आणि तुमच्या वैयक्तिक संदर्भात आधारलेली बुद्धिमत्ता पुरवते. डिव्हाइसवरील प्रक्रिया ही Apple Intelligence ची आधारशिला आहे, त्यामुळे ते तुमची वैयक्तिक माहिती गोळा न करता तुमच्या वैयक्तिक माहितीविषयी जागरूक असते.

अधिक संगणकीय क्षमतेची आवश्यकता असलेल्या अधिक क्लिष्ट विनंत्यांसाठी, Apple Intelligence ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ चा वापर करू शकते, जे iPhone सारख्या तुमच्या Apple उत्पादनांची गोपनीयता आणि सुरक्षा क्लाउडमध्ये वाढवते, जेणेकरून अधिक इंटेलिजन्स अनलॉक होऊ शकते. ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ Apple सिलिकॉनवर चालणारे अधिक मोठे, सर्व्हर आधारित मॉडेल वापरते. तुमचा डेटा कधीही संग्रहित केला जात नाही. याचा वापर फक्त तुमच्या विनंत्या पूर्ण करण्यासाठी केला जातो. आणि स्वतंत्र गोपनीयता आणि सुरक्षा संशोधक ह्या गोपनीयता वचनाची कधीही पडताळणी करू शकतात.

नोट : Apple Intelligence सर्व iPhone मॉडेल्सवर किंवा सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नाही. ** सर्वात अलीकडील उपलब्ध फीचर्स ॲक्सेस करण्यासाठी, तुम्ही iOS चे नवीनतम व्हर्जन वापरत असल्याची आणि Apple Intelligence सुरू केलेले असल्याची खात्री करा.

प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट बद्दल

जेव्हा युझर विनंती करतो, तेव्हा डिव्हाइसवर प्रक्रिया केली जाऊ शकते की नाही ह्याचे Apple Intelligence विश्लेषण करते. अधिक क्लिष्ट विनंत्यांसाठी, ते ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ वापरते, जे क्लाउडमध्ये तुमच्या iPhone ची गोपनीयता आणि सुरक्षा वाढवते. ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ सह, काढून टाकण्यापूर्वी, फक्त तुमच्या विनंतीशी संबंधित असलेल्या डेटावर Apple सिलिकॉन सर्व्हरवर प्रक्रिया केली जाते. जेव्हा विनंत्या ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ कडे रूट केल्या जातात, तेव्हा डेटा संग्रहित केला जात नाही किंवा Apple ला ॲक्सेस करता येत नाही आणि केवळ यूझरच्या विनंत्या पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. स्वतंत्र गोपनीयता आणि सुरक्षा संशोधक Apple सिलिकॉन सर्व्हरवर चालणाऱ्या कोडची तपासणी करू शकतात, जे ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ ला कोणत्याही वेळी ह्या गोपनीयता वचनाची पडताळणी करू देतात.

‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ चा पाया तयार करणारे Apple सिलिकॉन सर्व्हर अभूतपूर्व क्लाउड सुरक्षा प्रदान करतात. हे ‘Secure Enclave’ ने सुरू होते, जे यूझरच्या iPhone प्रमाणेच सर्व्हरवरील महत्त्वाच्या एन्क्रिप्शन ‘की’ सुरक्षित ठेवते, तसेच ‘सिक्योर बूट’ ह्याची खात्री देते की सर्व्हरवर चालणारी OS ही iOS प्रमाणेच स्वाक्षरीकृत आणि पडताळणी केलेले आहे. ‘ट्रस्टेड एक्झिक्युशन मॉनिटर’ ह्याची खात्री करते की केवळ सही आणि पडताळणी केलेला कोड रन केला जाईल आणि अटेस्टेशन यूझरच्या डिव्हाइसला विनंती पाठवण्यापूर्वी ‘खाजगी क्लाउड कॉम्प्युट’ क्लस्टरची ओळख आणि कन्फिगरेशन ह्या सुरक्षितपणे पडताळणी करण्यास एनेबल करते. आणि Apple च्या गोपनीयता वचनांची पडताळणी करण्यासाठी, स्वतंत्र तज्ज्ञ ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ सर्व्हरवर चालणाऱ्या सॉफ्टवेअरची तपासणी करू शकतात.

Apple Intelligence चा अहवाल तयार करणे

तुमच्या iPhone ने ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ ला पाठवलेल्या विनंत्यांचा अहवाल तुम्ही उत्पन्न करू शकता.

  1. सेटिंग वर जा, नंतर ‘गोपनीयता व सुरक्षा’ वर टॅप करा.

  2. ‘Apple Intelligence अहवाल’ वर टॅप करा, नंतर शेवटच्या 15 मिनिटांसाठीचा (डिफॉल्ट) किंवा शेवटच्या 7 दिवसांचा अहवाल कालावधी निवडा. अहवाल डिसेबल करण्यासाठी ‘ऑफ करा’ निवडा.

    नोट : तुम्ही कालावधी बदलल्यापासून कोणत्याही ‘प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युट’ विनंत्या केल्या नसल्यास अहवाल रिकामा असू शकतो.

  3. ‘ॲक्टिव्हिटी एक्सपोर्ट करा’ वर टॅप करा, फाइल स्टोअर करण्यासाठी जागा निवडा, नंतर ‘एक्सपोर्ट करा’ वर टॅप करा.

    अहवाल Apple_Intelligence_Report.json नावाच्या फाइलच्या रूपात जतन केला जातो.

  4. टेक्स्ट रीडरसह फाइल उघडा.

*Apple Intelligence जनरेटिव्ह मॉडेलचा वापर करते आणि आउटपुट बदलू शकतात. अचूकतेसाठी महत्त्वाची माहिती तपासा.
**Apple Intelligence सर्व iPhone 16 मॉडेल्स, iPhone 15 Pro, आणि iPhone 15 Pro Max वर बीटामध्ये उपलब्ध आहे, तसेच Siri आणि डिव्हाइसवर चीनी (सरलीकृत), इंग्रजी (ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, यूके किंवा यू.एस.), फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, कोरियन, पोर्तुगीज (ब्राझील) किंवा स्पॅनिशमध्ये सेट केलेले आहे. काही फीचर्स कदाचित सर्व प्रदेश किंवा भाषांमध्ये उपलब्ध नसतील. अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.