ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर ‘संगीत’ मध्ये गाणी शफल किंवा रिपीट करणे

तुम्ही तुमच्या लायब्ररीमधील सर्व गाणी आणि अल्बम शफल करू शकता (त्यांना रॅण्डम प्ले करू शकता) किंवा फक्त प्लेलिस्ट किंवा अल्बम शफल करू शकता. तुम्ही वैयक्तिक गाणी, प्लेलिस्ट किंवा अल्बम रिपीट देखील करू शकता.

  1. तुमच्या iPhone वर संगीत ॲपवर जा.

  2. गाणे प्ले होत असताना, ‘आता प्ले होत आहे’ स्क्रीन उघडण्यासाठी मिनीप्लेअर वर टॅप करा.

  3. ‘पुढील प्ले होत आहे’ बटण वर टॅप करा, त्यानंतर खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • तुमची गाणी रॅण्डम प्ले करा (शफल): शफल बटण वर टॅप करा. शफल बंद करण्यासाठी पुन्हा टॅप करा.

    • अल्बम, प्लेलिस्ट किंवा संपूर्ण यादी रिपीट करा : ‘रिपीट करा’ बटण वर टॅप करा.

      नोट : जेव्हा अनेक गाणी रिपीट केली जातात, तेव्हा तुम्ही बघू शकता की किती गाणी रिपीट केली जातील—फक्त यादीमध्ये तळाशी स्क्रोल करा.

    • एकच गाणे रिपीट करा : ‘रिपीट करा’ बटण वर डबल टॅप करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.