iPhone बॅटरी चार्जिंग ऑप्टिमाइझ करणे

iPhone मध्ये चार्जिंग फीचर्स समाविष्ट आहेत जे तुमची बॅटरी पूर्णपणे चार्ज राहण्याचा वेळ कमी करून तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यास मदत करतात. ‘ऑप्टिमाइझ्ड बॅटरी चार्जिंग’ सह, iPhone 80% नंतर चार्ज होणे पॉज करतो, नंतर तुम्ही सामान्यतः तुमचा iPhone अनप्लग करता त्या वेळेच्या जवळपास चार्जिंग पूर्ण करतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही सामान्यतः तुमचा iPhone सकाळी 7 वाजता अनप्लग करत असाल, तर चार्जिंग रात्रभरात 80% वर पॉज होऊ शकते आणि त्या वेळेच्या अगदी आधी पूर्ण होऊ शकते.

कशाची अपेक्षा करू शकता

  • त्यासाठी मार्ग आवश्यक आहे : जेव्हा तुमच्या iPhone ला असा अंदाज येतो की तो विस्तृत कालावधीसाठी, जसे की रात्रभर, चार्जरशी कनेक्ट केला जाईल, तेव्हा ‘ऑप्टिमाइझ्ड बॅटरी चार्जिंग’ सक्रिय होते. तुमच्या चार्जिंगच्या सवयी जाणून घेण्यासाठी ह्या फीचरला वेळ हवा असतो, त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवता, जसे की तुमचे घर आणि कार्यालय अशा ठिकाणी हे सर्वात सातत्यपूर्णतेने काम करते. तुमच्या चार्जिंगच्या सवयी अधिक भिन्न असतील, जसे की तुम्ही प्रवास करत असताना कदाचित ते सक्रिय होणार नाही.

  • हे नेहमीच सक्रिय नसू शकते : तुमचे चार्जिंग वेळापत्रक विसंगत असल्यास किंवा तुम्ही नवीन ठिकाणी असल्यास, ‘ऑप्टिमाइझ बॅटरी चार्जिंग’ कदाचित सक्रिय होणार नाही. अशा परिस्थितीत, तुमचा iPhone पॉज न होता 100% पर्यंत चार्ज होईल.

‘ऑप्टिमाइझ केलेले बॅटरी चार्जिंग’ ला तात्पुरते ओव्हरराइड करणे

तुम्हाला तुमचा iPhone निर्धारित वेळेपेक्षा लवकर पूर्ण चार्ज करायचा असेल तर तुम्ही ‘ऑप्टिमाइझ केलेले बॅटरी चार्जिंग’ ला तात्पुरते ओव्हरराइड करू शकता.

‘iPhone बॅटरी सेटिंग’ मधील चार्जिंग माहिती कार्ड. ‘चार्जिंग होल्डवर आहे’ संदेशासह बॅटरी 80% पर्यंत चार्ज असल्याचे कार्डवर दाखवले आहे : ऑप्टिमाइज केलेले बॅटरी चार्जिंग." ते 12:41 PM वाजता संपणार आहे, ‘चार्जिंग पुन्हा सुरू करा’ हा पर्याय उपलब्ध असेल.
  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ’बॅटरी’ वर टॅप करा, त्यानंतर ’चार्जिंग पुन्हा सुरू करा’ वर टॅप करा.

‘ऑप्टिमाइझ केलेली बॅटरी चार्जिंग’ सुरू किंवा बंद करणे

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. खालीलपैकी कोणतेही एक करा :

    • iPhone 14 किंवा त्याआधीच्या व्हर्जनवर : ‘बॅटरी’ वर टॅप करा, त्यानंतर ‘बॅटरीचे आरोग्य व चार्जिंग’ वर टॅप करा. ‘ऑप्टिमाइझ केलेली बॅटरी चार्जिंग’ सुरू किंवा बंद करा.

    • iPhone 15 किंवा नंतरच्या व्हर्जनवर : ’बॅटरी’ वर टॅप करा, त्यानंतर ’चार्जिंग’ वर टॅप करा. ‘ऑप्टिमाइझ केलेली बॅटरी चार्जिंग’ सुरू किंवा बंद करा.

ऑप्टिमाइझ केलेले चार्जिंग अपेक्षित वेळी सुरू होत नसल्यास, Apple सपोर्ट लेख तुमच्या iPhone वर ऑप्टिमाइझ केलेल्या बॅटरी चार्जिंगबद्दल माहितीपहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.