ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर पॉवर मोड्ससह बॅटरीचे आयुष्य वाचवणे

iPhone पॉवर सेव्हिंग फीचर्स प्रदान करते जे तुमच्या गरजेनुसार बॅटरीचे आयुष्य वाढवण्यात मदत करतात. iPhone ला तुमच्या वापराच्या पॅटर्नवर आधारित कामगिरी ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करण्याची अनुमती देण्यासाठी ’ॲडॅप्टिव्ह पॉवर’ वापरा किंवा तुमच्या फोनची बॅटरी कमी झाल्यावर मॅन्युअली विजेचा वापर कमी करण्यासाठी ’लो पॉवर मोड’ सुरू करा.

‘अडॅप्टिव्ह पॉवर’ सुरू करणे

iPhone 15 Pro किंवा नंतरच्या व्हर्जनवर, जेव्हा तुमचा वापर नेहमीपेक्षा जास्त असेल त्या दिवशी ‘अडॅप्टिव्ह पॉवर’ तुमच्या iPhone च्या बॅटरीचे लाइफ वाढवण्यात मदत करते. एकदा सुरू केल्यावर, ‘अडॅप्टिव्ह पॉवर’ बॅकग्राऊंडमध्ये ऑटोमॅटिकली काम करते त्यामुळे तुम्हाला ते मॅनेज करण्याची गरज नाही. तुमच्या अलीकडील वापराच्या पॅटर्न्सवर आधारित तुम्हाला अतिरिक्त बॅटरी पॉवर कधी लागेल ह्याचा अंदाज लावण्यासाठी हे ऑन डिव्हाइस इंटेलिजन्सचा वापर करते, नंतर तुमची बॅटरी जास्त काळ टिकून राहण्यास मदत करण्यासाठी कार्यक्षमतेशी संबंधित ॲडजस्टमेंट्स करते.

नोट : iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone Air वर, ‘अडॅप्टिव्ह पॉवर’ डिफॉल्टनुसार ऑन असते.

एनेबल केल्यावर, ‘ॲडॅप्टिव्ह पॉवर’ स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करू शकते, बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी मर्यादित करू शकते आणि दिवसभर वीज बचत करण्यासाठी कार्यक्षमतेशी संबंधित ॲडजस्टमेंट्स करू शकते. तुमच्या फोनची बॅटरी 20% राहिल्यास तो लो पॉवर मोड ऑटोमॅटिकली सुरू देखील करू शकतो.

  1. तुमच्या iPhone वर ‘सेटिंग’ ॲपवर  जा.

  2. ‘बॅटरी’ वर टॅप करा, ‘पॉवर मोड’ वर टॅप करा, नंतर ‘अडॅप्टिव्ह पॉवर’ सुरू किंवा बंद करा.

दिवसा ‘अडॅप्टिव्ह पॉवर’ सुरू झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळू शकतात : ‘सेटिंग’ ॲपवर जा, ‘बॅटरी’ वर टॅप करा, ‘पॉवर मोड’ वर टॅप करा, त्यानंतर ‘अडॅप्टिव्ह पॉवर नोटिफिकेशन्स’ सुरू किंवा बंद करा. तुम्ही नोटिफिकेशन्स बंद केल्यास, ‘अडॅप्टिव्ह पॉवर’ तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यास मदत करणे सुरू ठेवते.

लो पॉवर मोड मॅनेज करणे

‘लो पॉवर मोड’ बॅटरी कमी झाल्यावर तुमचा iPhone वापरत असलेल्या पॉवरचे प्रमाण कमी करतो. ह्यामुळे कॉल करणे आणि प्राप्त करणे, ईमेल आणि संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे, इंटरनेट ॲक्सेस करणे आणि ह्यासारख्या बऱ्याच आवश्यक कार्यांसाठी कार्यक्षमता ऑप्टिमाइझ केली जाते. iPhone ProMotion डिस्प्ले टेक्नॉलॉजी मॉडेल वर, ‘लो पॉवर मोड’ डिस्प्ले रिफ्रेश रेट प्रति सेकंद 60 फ्रेमपर्यंत मर्यादित करतो.

नोट : ‘लो पॉवर मोड’ मध्ये असताना iPhone काही कार्ये अधिक हळू करू शकतो.

‘लो पॉवर मोड’ सुरू किंवा बंद करण्यासाठी, पुढीलपैकी कोणतेही काम करा :

  • iPhone 14 किंवा त्याआधीचे व्हर्जन : ‘सेटिंग’ ॲपवर जा, त्यानंतर ’बॅटरी’ वर टॅप करा. ’लो पॉवर मोड’ वर टॅप करा.

  • iPhone 15 किंवा नंतरचे व्हर्जन : ‘सेटिंग’ ॲपवर जा, त्यानंतर ’बॅटरी’ वर टॅप करा. ’पॉवर मोड’ वर टॅप करा, त्यानंतर ’लो पॉवर मोड’ वर टॅप करा.

  • कंट्रोल सेंटरमध्ये : ‘लो पॉवर मोड’ बटण ला ’कंट्रोल सेंटर’ मध्ये समाविष्ट करा, नंतर ‘लो पॉवर मोड’ बटण वर टॅप करा.

जेव्हा iPhone 80% किंवा त्याहून अधिक चार्ज होतो तेव्हा लो पॉवर मोड ऑटोमॅटिकली बंद होतो.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.