ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर स्क्रीनशॉट घ्या

जेव्हा तुम्हाला तुमच्या iPhone स्क्रीनवर काय आहे ते कॅप्चर करायचे असेल, तेव्हा त्याचे छायाचित्र घ्या जेणेकरून तुम्ही ते नंतर बघू शकाल, इतरांबरोबर शेअर करू शकाल किंवा ते डॉक्युमेंट्सला अटॅच करू शकाल. तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट मिळवू शकता किंवा विशिष्ट भाग जतन करू शकता.

Face ID असलेल्या iPhone सह स्क्रीनशॉट घेणे

  1. एकाच वेळी ‘साइड’ बटण आणि ‘व्हॉल्यूम वाढवा’ बटण त्वरित प्रेस करा आणि सोडा.

    Face ID सह iPhone. स्क्रीनशॉट कसा घ्यावा हे दाखवण्यासाठी एक ॲरो साइड बटणाकडे निर्देश करतो आणि दुसरा ॲरो ‘व्हॉल्यूम वाढवा’ बटणाकडे निर्देश करतो.
  2. स्क्रीनशॉट संपादित करा, पाठवा, जतन करा किंवा रद्द करा.

Touch ID असलेल्या iPhone सह स्क्रीनशॉट घेणे

  1. एकाच वेळी साइड बटण आणि होम बटण त्वरित प्रेस करा आणि सोडा.

    Touch ID सह iPhone. स्क्रीनशॉट कसा घ्यावा हे दाखवण्यासाठी एक ॲरो साइड बटणाकडे निर्देश करतो आणि दुसरा ॲरो ‘होम’ बटणाकडे निर्देश करतो.
  2. स्क्रीनशॉट संपादित करा, पाठवा, जतन करा किंवा रद्द करा.

स्क्रीनशॉट संपादित करणे, पाठवणे, जतन करणे किंवा रद्द करणे

स्क्रीनशॉट स्क्रीन, ज्यामध्ये वरच्या बाजूला (डावीकडून उजवीकडे) ‘विंडो बंद करा’, ‘मार्कअप’, ‘शेअर करा’ आणि ‘पूर्ण’ ह्यांसाठी बटणे आहेत. तळाशी (डावीकडून उजवीकडे) ’विचारा’, ’भाषांतर’ आणि ’सर्च’ साठी बटणे आहेत.

तुम्ही स्क्रीनशॉट घेतल्यानंतर, पुढीलपैकी कोणतेही काम करा :

  • क्रॉप करा : केवळ तुम्हाला हवा असलेला भाग जतन करण्यासाठी हॅंडल्स ड्रॅग करा.

  • ॲनोटेट करा : मार्कअप बटण वर टॅप करा, नंतर मार्कअप टूल्स वापरा.

  • शेअर करा : ‘शेअर करा’ बटण वर टॅप करा, नंतर शेअरिंग पर्याय निवडा.

  • जतन करा : ‘सिलेक्ट केलेले’ बटण वर टॅप करा, नंतर पर्याय निवडा.

    डिफॉल्टनुसार, स्क्रीनशॉट्स ‘छायाचित्र’ ॲपमधील तुमच्या छायाचित्र लायब्ररीमध्ये जतन केले जातात. तुमचे सर्व स्क्रीनशॉट्स पाहण्यासाठी, ’छायाचित्र’ ॲप उघडा, ’संग्रह’ वर टॅप करा, ’मीडिया प्रकार’ पर्यंत खाली स्क्रोल करा, नंतर ’स्क्रीनशॉट्स’ वर टॅप करा.

  • रद्द करा किंवा हटवा : ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

तुम्ही व्हिज्युअल इंटेलिजन्सचा वापर टेक्स्टशी संवाद साधण्यासाठी, समान इमेजेस शोधण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी देखील करू शकता.

पूर्ण पृष्ठ स्क्रीनशॉट घेणे

तुमच्या iPhone स्क्रीनच्या लांबीच्या बाहेर जाणाऱ्या, म्हणजेच, Safari मधील संपूर्ण वेबपृष्ठ ह्यासारख्या कॉण्टेंटचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.

  1. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • Face ID सह iPhone वर : एकाच वेळी ‘साइड’ बटण आणि ‘व्हॉल्यूम वाढवा’ बटण त्वरित प्रेस करा आणि सोडा.

    • होम बटणासह iPhone वर : एकाच वेळी साइड बटण आणि होम बटण त्वरित प्रेस करा आणि सोडा.

  2. ’पूर्ण पृष्ठ’ वर टॅप करा, त्यानंतर पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • खाली स्क्रोल करा : स्क्रीन शॉटचा अधिक भाग पाहण्यासाठी उजवीकडील प्रीव्ह्यू इमेजवर तुमचे बोट ड्रॅग करा.

    • क्रॉप करा : ‘क्रॉप करा’ बटण वर टॅप करा, त्यानंतर फक्त तुम्हाला हवा असलेला भाग जतन करण्यासाठी हॅंडल्स ड्रॅग करा.

    • इमेज म्हणून जतन करा : ‘सिलेक्ट केलेले’ बटण वर टॅप करा, त्यानंतर ’छायाचित्र ॲपमध्ये जतन करा’ वर टॅप करा.

    • PDF जतन करा : ‘सिलेक्ट केलेले’ बटण वर टॅप करा, ’फाइल्समध्ये PDF जतन करा’ वर टॅप करा, त्यानंतर स्थान निवडा.

    • रद्द करा किंवा हटवा : ‘बंद करा’ बटण वर टॅप करा.

स्क्रीनशॉट्स घेण्याचे इतर मार्ग

स्क्रीनशॉट घेण्याचे काही पर्यायी मार्ग येथे दिले आहेत :

स्क्रीनशॉट्ससाठी डीफॉल्ट सेटिंग बदलणे

तुम्ही स्क्रीन कॅप्चर सेटिंग ॲडजस्ट करू शकता जेणेकरून स्क्रीनशॉट्स पूर्ण स्क्रीनमध्ये किंवा तळाशी डाव्या कोपऱ्यात तात्पुरते थंबनेल्स म्हणून दिसतील. तुम्ही स्क्रीनशॉट्स SDR किंवा HDR फॉरमॅटमध्ये देखील जतन करू शकता. स्क्रीन कॅप्चर सेटिंग बदला पहा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.