ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone वर फोकस सेट अप करणे

फोकस हे असे फीचर आहे, तुम्हाला व्यत्यय कमी करून एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. जेव्हा तुम्हाला विशिष्ट ॲक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करायचे असते, तेव्हा तुम्ही प्रदान केलेल्या फोकस पर्यायांपैकी एक पर्याय कस्टमाइझ करू शकता—उदाहरणार्थ, काम, वैयक्तिक किंवा झोप—किंवा कस्टम फोकस तयार करा. सर्व नोटिफिकेशन तात्पुरते सायलेंट करण्यासाठी तुम्ही फोकस वापरू शकता किंवा केवळ तुमच्या कामाशी संबंधित असलेल्या विशिष्ट नोटिफिकेशनना अनुमती देऊ शकता—उदाहरणार्थ, तुम्ही व्यस्त आहात हे इतर लोकांना आणि ॲपना कळवणे.

जर Apple Intelligence* सुरू केलेले असेल, तर तुम्ही ‘व्यत्यय कमी करा’ फोकस देखील वापरू शकता, जो तुम्हाला फक्त सर्वात महत्त्वाची नोटिफिकेशन्स दाखवण्यासाठी Apple Intelligence वापरतो. ‘व्यत्यय कमी करा फोकस’ वापरणे पहा.

टिप : सर्व नोटिफिकेशन त्वरित सायलेंट करण्यासाठी, कंट्रोल सेंटर उघडा, ‘फोकस’ वर टॅप करा, नंतर ‘डू नॉट डिस्टर्ब’ चालू करा.

फोकस सेट अप करणे

  1. सेटिंग वर जा, ‘फोकस’ वर टॅप करा, नंतर ‘फोकस’ वर टॅप करा—उदाहरणार्थ, ‘डू नॉट डिस्टर्ब’, वैयक्तिक किंवा काम.

    प्रदान केलेले पाच फोकस पर्याय दाखवणारी स्क्रीन—‘डू नॉट डिस्टर्ब’, कॉलच्या दरम्यान कोणतेही संदेश नको, झोप, वैयक्तिक आणि काम. तुमच्या Apple डिव्हाइसेसवर समान फोकस सेटिंग वापरण्याची अनुमती देणारा ’सर्व डिव्हाइसवर शेअर करा’ पर्याय चालू आहे.
  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

फोकस फिल्टर समाविष्ट करणे

जेव्हा तुम्ही फोकस सेट अप करता, तेव्हा तुम्ही ॲप फिल्टर समाविष्ट करू शकता जे हे निश्चित करतात की ‘फोकस’ दरम्यान ॲप कोणती माहिती दाखवेल. उदाहरणार्थ, ‘फोकस’ दरम्यान कोणते मेल अकाउंट किंवा कोणती दिनदर्शिका वापरायची हे तुम्ही निवडू शकता.

  1. सेटिंग  > ‘फोकस’ वर जा, नंतर तुम्हाला फिल्टर समाविष्ट करायचे असलेल्या ‘फोकस’ वर टॅप करा.

  2. ‘फोकस फिल्टर’ साठी खाली स्क्रोल करा, नंतर ’फिल्टर समाविष्ट करा’ वर टॅप करा.

  3. ‘ॲप किंवा सिस्टीम फिल्टर’ वर टॅप करा, नंतर ‘फोकस’ दरम्यान तुम्हाला पहायच्या असलेल्या ॲपमधून माहिती सिलेक्ट करा.

  4. फोकसमध्ये फिल्टर समाविष्ट करण्यासाठी ‘समाविष्ट करा’ वर टॅप करा.

नोट : तुमच्याकडे सेटिंग > ‘फोकस’ मध्ये सर्व डिव्हाइसेसवर शेअर करा सुरू केलेले असल्यास फोकस फिल्टर्स डिव्हाइसेसवर सिंक केले जात नाहीत.

कस्टम फोकस तयार करणे

दिलेल्या कोणत्याही फोकस पर्यायांपेक्षा तुम्हाला वेगळ्या ॲक्टिव्हिटीवर फोकस करायचा असल्यास, तुम्ही ‘कस्टम फोकस’ तयार करू शकता.

कस्टम, ड्रायव्हिंग, फिटनेस, गेमिंग, माइंडफुलनेस आणि वाचन ह्यासह प्रदान केलेल्या अतिरिक्त फोकस पर्यायांसाठी फोकस सेटअप स्क्रीन.
  1. सेटिंग  > ‘फोकस’ वर जा.

  2. वरच्या उजव्या बाजूला ‘समाविष्ट करा’ बटण वर टॅप करा, नंतर ‘कस्टम करा’ वर टॅप करा.

  3. तुमच्या ‘फोकस’ साठी नाव प्रविष्ट करा, नंतर ‘परत’ वर टॅप करा.

  4. तुमचा ‘फोकस’ दर्शविण्यासाठी रंग आणि आयकॉन निवडा, नंतर ‘पुढील’ वर टॅप करा.

  5. ‘फोकस कस्टमाइझ करा’ वर टॅप करा, नंतर तुमच्या कस्टम फोकससाठी पर्याय सेट अप करा.

तुमच्या सर्व Apple डिव्हाइसवर तुमचे फोकस सेटिंग अद्ययावत ठेवणे

तुम्ही एकाच Apple अकाउंटने साइन केलेले असल्यास तुम्ही तुमच्या सर्व Apple डिव्हाइसवर एकच फोकस सेटिंग वापरू शकता.

  1. सेटिंग  > ‘फोकस’ वर जा.

  2. ‘सर्व डिव्हाइसवर शेअर करा’ चालू करा.

    नोट : जेव्हा तुम्ही ’सर्व डिव्हाइसेसवर शेअर करा’ आणि ’फोकस स्टेटस शेअर करा’ सुरू करता, तेव्हा तुमचा ’फोकस’ हे दाखवू शकतो की तुम्ही नोटिफिकेशन्स सायलेंट केलेले आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही फोकस सेट अप केल्यावर तुम्ही नोटिफिकेशन्स सायलेंट केल्यास, तुम्हाला टेक्स्ट पाठवणारे लोक तुमचे नोटिफिकेशन्स सायलेंट आहेत हे पाहू शकतील. तुम्ही विशिष्ट लोकांसाठी त्यांच्या संपर्क कार्डवरील हे सेटिंग बदलू शकता.

*Apple Intelligence बीटामध्ये पुढील भाषांच्या सपोर्टसह उपलब्ध आहे : इंग्रजी, डॅनिश, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, नॉर्वेजियन, पोर्तुगीज, स्पॅनिश, स्वीडिश, तुर्की, चिनी (सरलीकृत), चिनी (पारंपारिक), जपानी, कोरियन आणि व्हिएतनामी. काही फीचर्स सर्व भाषा किंवा प्रदेशात उपलब्ध नसतील. भाषा आणि फीचर उपलब्धता आणि सिस्टीम आवश्यकतांविषयी अधिक माहितीसाठी, Apple Intelligence कसे प्राप्त करावे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.