ह्या कंट्रोलमध्ये बदल केल्यामुळे हे पेज ऑटोमॅटिकली अपडेट होईल

iPhone कॅमेरा बेसिक

तुमच्या iPhone कॅमेऱ्याने छायाचित्रे कशी घ्यायची ते जाणून घ्या. छायाचित्र, व्हिडिओ, सिनेमॅटिक, पॅनो आणि पोर्ट्रेट ह्यासारख्या कॅमेरा मोडमधून निवडा आणि तुमचा शॉट फ्रेम करण्यासाठी झूम इन किंवा झूम आउट करा.

कॅमेरा उघडणे

तुमचा iPhone कॅमेरा उघडण्यासाठी, खालीलपैकी कोणतेही एक करा :

Siri : “Open Camera.” ह्यासारखे काहीतरी Siri ला सांगा Siri कसे वापरायचे ते जाणून घ्या.

नोट : तुमच्या सुरक्षेसाठी, ‘कॅमेरा’ वापरात असताना स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात हिरवा डॉट दिसेल. हार्डवेअर फीचरचा ॲक्सेस नियंत्रित करा पहा.

छायाचित्र काढणे

  1. तुमच्या iPhone वर कॅमेरा उघडा.

  2. छायाचित्र घेण्यासाठी शटर बटणावर टॅप करा किंवा दोन्हीपैकी एक व्हॉल्यूम बटण दाबा.

    कॅमेरा ‘छायाचित्र’ मोडमध्ये उघडलेला आहे. ‘कॅमेरा कंट्रोल्स’ बटण वरच्या उजव्या कोपऱ्यात आहे. ‘छायाचित्र आणि व्हिडिओ व्ह्यूअर’ बटण खालच्या डाव्या कोपऱ्यात आहे. ‘टेक पिक्चर’ बटण खाली मध्यभागी आहे आणि ‘कॅमेरा चूझर बॅक फेसिंग’ बटण खालच्या उजव्या कोपऱ्यात आहे.

    सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सवर, कॅमेरा ॲप उघडण्यासाठी ‘कॅमेरा कंट्रोल’ वर क्लिक करा, त्यानंतर छायाचित्र काढण्यासाठी पुन्हा क्लिक करा.

    AirPods आणि AirPods Pro च्या सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्ससह, तुम्ही छायाचित्र घेण्यासाठी AirPod स्टेम दाबू शकता. सपोर्ट करणाऱ्या कॅमेरा ॲप्ससह AirPods किंवा AirPods Pro वापरा AirPods यूझर गाइडमध्ये पहा.

    तुमच्याकडे Apple Watch असल्यास, तुम्ही छायाचित्र घेण्यासाठी ‘कॅमेरा रिमोट’ वापरू शकता. Apple Watch यूझर गाइडमध्ये Apple Watch वर ‘कॅमेरा रिमोट’ वापरा पहा.

कॅमेरा मोडमध्ये स्विच करणे

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ‘कॅमेरा’ ॲप उघडता, तेव्हा ‘छायाचित्र मोड’ सिलेक्ट केला जातो आणि छायाचित्र आणि व्हिडिओ मोड्स स्क्रीनवर दिसतात. दोन्हीमध्ये स्विच करण्यासाठी ‘छायाचित्र’ किंवा ‘व्हिडिओ’ वर टॅप करा, किंवा इतर मोड्स निवडण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.

तुमच्या iPhone मॉडेलनुसार, तुम्ही पुढील मोडमधून सिलेक्ट करू शकता :

तुम्ही कॅमेरा उघडल्यावर डिफॉल्ट मोड म्हणून छायाचित्र मोड व्यतिरिक्त अन्य मोड सेट करण्यासाठी, iPhone वर कॅमेरा सेटिंग जतन करणे पहा.

झूम इन किंवा झूम आउट करणे

  1. तुमच्या iPhone वर कॅमेरा उघडा.

  2. पुढीलपैकी कोणतेही एक करा :

    • झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठी स्क्रीनला पिंच करा.

    • फ्रेमच्या तळाशी झूम कंट्रोलला टच आणि होल्ड करा, त्यानंतर स्लायडरला डावीकडे किंवा उजवीकडे ड्रॅग करा.

    • सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सवर, (तुमच्या मॉडेलनुसार) झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठी 0.5x, 1x, 2.5x, 3x, 4x, 5x किंवा 8x वर टॅप करा.

    • सपोर्ट करणाऱ्या मॉडेल्सवर, उपलब्ध कॅमेरा सेटिंग दाखवणारे ओव्हरले उघडण्यासाठी कॅमेरा कंट्रोल वर दोनदा हलकेच दाबा. झूम सेटिंग सिलेक्ट करण्यासाठी तुमच्या बोटाने स्लाइड करा, त्यानंतर त्यावर हलकेच दाबा. झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी तुमच्या बोटाने पुन्हा स्लाइड करा.

Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.
उपयुक्त आहे का?
कॅरॅक्टर मर्यादा : 250
कमाल कॅरॅक्टर मर्यादा 250 आहे.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Morty Proxy This is a proxified and sanitized view of the page, visit original site.