इ.स. २०१९
Appearance
| सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
| शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
| दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
| वर्षे: | २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०१९ हे इसवी सनामधील २०१९ वे, २१व्या शतकामधील १९वे तर २०१० च्या दशकामधील दहावे वर्ष आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]फेब्रुवारी
[संपादन]- १४ फेब्रुवारी - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३९ भारतीय जवान हुतात्मा झाले.
मार्च
[संपादन]- १५ मार्च - न्यू झीलंडच्या क्राइस्टचर्च शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार झाल्या.
जुलै
[संपादन]- ३० जुलै - भारताने ट्रिपल तलाक पद्धतीवर बंदी घातली.
ऑगस्ट
[संपादन]- ५ ऑगस्ट - भारताने जम्मू आणि काश्मीर राज्याला दिलेला विशेष दर्जा (कलम ३७०) रद्द केले आणि राज्याचे विभाजन करून लडाख व जम्मू आणि काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश स्थापन केले.
नोव्हेंबर
[संपादन]- २३ नोव्हेंबर - 'इमाम' नावाच्या जगातील शेवटच्या सुमात्री गेंड्याचा मृत्यू झाल्याने ही प्रजाती मलेशियामध्ये नामशेष झाली.[१]
मृत्यू
[संपादन]जानेवारी
[संपादन]- २ जानेवारी - रमाकांत आचरेकर, भारतीय क्रिकेट प्रशिक्षक (जन्म: १९३२).
- ३ जानेवारी - चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि न्यायाधीश (जन्म: १९२७).
- ११ जानेवारी - किशोर प्रधान, भारतीय अभिनेता (जन्म: १९३६).
- २९ जानेवारी - जॉर्ज फर्नान्डिस, भारतीय राजकारणी आणि माजी केंद्रीय मंत्री (जन्म: १९३०).
फेब्रुवारी
[संपादन]- ४ फेब्रुवारी - रमेश भाटकर, मराठी अभिनेता (जन्म: १९५२).
मार्च
[संपादन]- १७ मार्च - मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री (जन्म: १९५५).
जून
[संपादन]- १० जून - गिरीश कर्नाड, कन्नड लेखक, नाटककार आणि अभिनेता (जन्म: १९३८).
जुलै
[संपादन]- १३ जुलै - सदाशिव वसंत गोरक्षकर, भारतीय लेखक आणि संग्रहाध्यक्ष (जन्म: १९३३).
- २० जुलै - शीला दीक्षित, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री (जन्म: १९३८).
ऑगस्ट
[संपादन]- ६ ऑगस्ट - सुषमा स्वराज, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री (जन्म: १९५२).
- १५ ऑगस्ट - विद्या सिन्हा, हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १९४७).
- १५ ऑगस्ट - व्ही.बी. चंद्रशेखर, भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: १९६१).
- १९ ऑगस्ट - खय्याम, भारतीय संगीतकार (जन्म: १९२७).
- १९ ऑगस्ट - जगन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १९३७).
- २१ ऑगस्ट - बाबुलाल गौर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १९३०).
- २४ ऑगस्ट - अरुण जेटली, भारताचे माजी संरक्षण आणि अर्थमंत्री (जन्म: १९५२).
सप्टेंबर
[संपादन]- ८ सप्टेंबर - राम जेठमलानी, भारतीय वकील आणि माजी केंद्रीय कायदामंत्री (जन्म: १९२३).
- ३० सप्टेंबर - विजू खोटे, भारतीय अभिनेता (जन्म: १९४१).
ऑक्टोबर
[संपादन]- २० ऑक्टोबर - दादू चौगुले, मराठी कुस्तीगीर (जन्म: १९४६).
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Malaysia's last Sumatran rhino Iman dies, making the species now extinct in the country". द स्टार (इंग्रजी भाषेत). २७ मार्च २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
